Friday 25 April 2014

अहमदनगर

पौराणिक महत्त्व :
अहमदनगर हे पौराणिक महत्त्व लाभलेले शहर आहे. रामायण काळात अगस्त्य श्रुषींनी विंध्य पर्वत ओलांडुन गोदावरी नदीच्या जवळ म्हणजे आताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे. येथेच प्रभु श्रीरामांची त्यांनी भेट घेतल्याचे मानले जाते.
भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपुर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्त्खननातुन या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिध्द झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये पहिली वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्यातील डेक्कन कॉलेजने नेवाशातील उत्त्खननानंतर लावला.
ऐतीहासिक महत्तव :
इ.स. २४० मध्ये मौर्य सम्राट अशोकाच्याकाळात अहमदनगरचा जुन्नर आणि पैठणमधील महत्तवाचे स्थान म्हणुन उल्लेख मिळतो. इ.स. ४०० पर्यंत नगर राष्ट्रकुट वंशाच्या अधिपत्याखाली राहिले. त्यानंतर इ.स. ६७० पर्यंत चालक्य आणि पश्चिमी चालुक्यांची राजवट होती. इ.स. ६७० ते इ.स. ९७३ पर्यंत राष्ट्रकुट वंशजांनी राज्य केले.
राष्ट्रकुट वंशाली सर्वात बलबान गोविंद ३रा याने इ.स. ७८० ते इ.स. ८१० पर्यंत राज्य केले.
इ.स. ९७३ ते इ.स. ११९० पर्यंत पश्चिमी चालुक्य वंशजानी राज्य केले. अकोला तालुक्यातील हरिषचंद्र गडावरील नक्षिदार मंदीर व गुहाचे निर्माण झाले. पश्चिमी चालुक्यानंतर अहमदनगर देवगिरीयादवांकडे आले. त्यांनी इ.स.११७० ते इ.स.१३१० राज्य केले. आत्ताचे दौलताबाद ही यादवाची राजधानी होती. अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे त्यावेळेसचे मंत्री हेमाडी ज्यांनी मोडी लिपीचा शोध लावला जी की अजुन ही अभ्यासक तीचे अध्य्यन करत आहेत. हेमाडी हे खुप हुशार वास्तुकार होते. अहमदनगर जिल्ह्यात २६ हेमाडी मंदीर अजुनही अस्तित्वात आहेत. यादव वंशातील प्रसिध्द राजा रामदेवराव यांच्या नावाचा उल्लेख संत ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आढळ्तो. पुर्वतयारी आभावी शक्तिशाली व धाडसी सैन्याच्या इ.स.१२९४ साली आदिल खिलाजीच्या हातुन देवगिरीत पराभव झाला. आदिल खिलाजी हा दिल्लीचा मुघल बादशहा जलालुदीन खिलाजीचा वजीर होता. हा दक्षिण मुगल बादशहाचा विंध्य पर्वताकडील पहीला विजय होता. त्यानंतर इ.स.१३१८ पर्यंत द्ख्खनमध्ये मुघल साम्राज्याचा विस्तार झाला व त्यानंतर महाराष्ट्रासाठी दिल्लीतुन नियुक्त आणि देवगिरीत स्थित राज्यपालाकडुन शासन चालवु लागले.



अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक
उपविभाग
मुख्यालयअहमदनगर
तालुके १. अकोले २. कर्जत ३. कोपरगाव ४. जामखेड. नगर ६. नेवासा ७. पाथर्डी ८. पारनेर ९. राहाता १०. राहुरी ११. शेवगाव १२. श्रीगोंदा १३. श्रीरामपुर १४. संगमनेर
लोकसंख्या ४५,४३,०८०(२०११)
लोकसंख्या घनता २६०/कि.मी वर्ग
शहरी लोकसंख्या १७.६७%
साक्षरता दर ८०.२२%
लिंग गु्णोत्तर१.०७ पु./स्त्री
जिल्हधिकारी डॉ. संजीवकुमार
लोकसभा मतदारसंघ १.अहमदनगर २.शिर्डी
विधानसभा मतदारसंघ १.अहमदनगर शहर २.पारनेर ३.कर्जत जामखेड ४.शेवगाव ५.श्रीगोंदा ६.श्रीरामपुर ७.राहुरी ८.शिर्डी ९.अकोले १०.कोपरगाव ११.नेवासा १२.संगमनेर
खासदार १.श्री दिलीप कुमार गांधी २.श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे
पर्जन्यमान ५०१.८ मिमी
इ.स. १३३८ मध्ये दिल्लीचा बाद्शहा मोहम्मद तुघलक ने दौलताबाद सोड्ल्यानंतर तेथील मंत्र्यांकडुन दौलताबाद्ची लुटालुट सुरू झाली. यामध्ये गुलबर्गामधील गंगु ब्राम्हण याचा शिष्य अलादिन ह्सन गंगु सर्व बंड मोडुन राज्य स्थापन करण्यास यशस्वी झाला. हे राज्य ब्राम्हणी किंवा बहामणी म्हणुन ओळखले गेले. हसन गंगु बहामणीनंतर १५० वर्षे येथे १३ राज्यांनी राज्य केले.
इ.स १४६०,१४७२ व १४७३ मध्ये पड्लेल्या मोठ्या दुष्काळाचा सामना करण्यात प्रधानमंत्री मोहम्म्द गवान असफल झाला. त्यामुळे तेथील मंत्री खुप ग्रासले होते. त्यांनी मोहम्म्द गवान विरुध्द बरेच आरोप कट कारस्थाने करुन इ.स.१४८७ मध्ये त्याला मारण्यात आले. १५ व्या शतकाच्या शेवटी तत्कालीन बहामणी राज्याचे ५ तुकडे झाले. त्यामधुन फु़टुन निघालेल्या मलिक अहमद्शहा बिहरी या निजामशहाने मे १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर बसवण्यास सुरवात केली व त्याच्या नावावरुन शहराला अहमदनगर हे नाव पडले. इ.स.१४९४ मध्ये शहर स्थापना पुर्ण होऊन निजामशहाची राजधानी बनली. अहमदशहा, बुरहानशहा, सुलतान चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मुर्तझाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ अहमदनगरने मराठेशाही व शहाजहान बादशाही, मोघलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले.
इ.स.१८२२ मध्ये इंग्रजांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
शासक
शासनकाळ
बुरहाण निजाम शहा
इ.स. १५०८- इ.स. १५५३
हुसेन निजाम शहा
इ.स. १५५३- इ.स. १५६५
मुर्तझा निजाम शहा
इ.स. १५६५- इ.स. १५८८
मिरन हुसेन निजाम शहा
इ.स. १५८८
ईसमाईल निजाम शहा
इ.स. १५८८- इ.स. १५९०
बुरहाण निजाम शहा -२रा
इ.स. १५९०- इ.स. १५९४
ईब्राहिम निजाम शहा
इ.स. १५९४
अहमद २रा
इ.स. १५९४- इ.स. १५९५
मुर्तझा निजाम शहा २रा
इ.स. १६००- इ.स. १६१३
मुघल/दिल्ली शासक
इ.स. १६३६- इ.स. १७५९
मराठा शासनकाळ
इ.स. १७५९- इ.स. १८१७
ब्रिटीश शासक
इ.स. १८१७- इ.स. १९४७

भौगोलिक महत्तव : -
अहमदनगर हा क्षेत्रफ़ळाच्या दृ्ष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सिमा आहेत. पुर्वस ठाणे व पुणे जिल्हा आहे आणि पश्चिमेस बीड, उस्मानाबाद व सोलापुर जिल्हा आहे.
अहमदनगर जिल्ह्याची विभिन्न भुमी रुपे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमी भागात सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आहेत त्याला कळ्सुबाई, अदुळा, बालेश्वर आणि हरिशचंद्र श्रुंखला म्हट्ले जाते. कळ्सुबाई हे महाराष्ट्रातले सर्वात ऊंच शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात हरिषचंद्रगड, रतनगड, कुलांग अजुबा हे शिखर आहेत. जिल्ह्यात विटा घाट रंधा धबधब्याला जाताना लागतो चंदनपुरी घाट पुणे-संगमनेर रोड मध्ये आहे. जिल्ह्याच्या उत्तरी भागात गोदावरी आणि प्रवरा या मैदानी नद्या आहेत. जिल्ह्याच्या भौगोलिक भागाचा विचार करता त्याचे ३ मुख्य भाग पडतात ते खालीलप्रमाणे : -
१.पश्चिमी डोंगराळ भाग : -
अकोला संगमनेर याभागात मोडतात. अडुला, बेलेश्वर व हरिषचंद्रगड याभागात येतो आणि बरेच उंच शिखर या भागात येतात. कळ्सुबाई यातील एक आहे. त्याची उंची ५४२७ फ़ुट उंच आहे. हा सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर आहे.
२.मध्यपठारी भाग : -
पारनेर, अहमदनगर आणि संगमनेरश्रीगोंदा आणि कर्जतचा काही भाग येतो.
३.उत्त्तरी आणि दक्षिणी मैदानी भाग :
या भागात उत्तरी कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर, राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्याचा समावेश होतो. या भागात घोड, भीमा, सीना या नद्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात गोदवरी आणि भीमा या दोन प्रमुख नद्या आहेत. प्रवरा ही गोदवरीची उपनदी आहे. प्रवराच्या उंचावरुन पडणाऱ्या प्रवाहमुळे रंधा धबधबा तयार झाला आहे. जिल्ह्याचा पश्चिमी भाग जंगलाने विस्तारलेला आहे. या जंगलात मुख्यतहा सागवान, बाभुळ, हळ्दु आणि निंब ही झाडे सापडतात. जंगल आंबे, आवळा, बोर, करवंद ही फ़ळ झाडे आढळतात.
हवामान :
समुद्रापासुन दुर असल्यामुळे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागातील हवामान त्यामानाने थोडे थंड आहे. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले आहे. जिल्ह्यातील पश्चिमी भागात जास्त पाऊस पडतो.
औद्योगिक :
अहमदनगर जिल्हा हा आशिया खंडातील सर्वात जास्त साखर उत्त्पन्न करणारा जिल्हा आहे.साखर उत्पादनात अहमदनगर जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरा नगर येथे राज्यातील पहिली पतपेढी १९२३ साली स्थापन केली, तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना जुन १९५० मध्ये स्थपन केला आणि सहकार या तत्वाची सुरवात केली. प्रसिध्द अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. अहमदनगर, अकोले व संगमनेर तालुक्यांत विड्या वळण्याचा उद्योग चालतो. अकोले तालुक्यात हातसडीचे तांदुळ तयार करणे आणि औषधी वनस्पती तयार करने हे उद्योग चालतात. अहमदनगर, भिंगार, संगमनेर खर्डा येथे हातमागावर व यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो.
संगमनेर, कर्जत आणि पाथर्डी या तालुक्यांत मेंढ्यांच्या लोकरीपासुन घोंगडी विणण्याचा व्यवसाय चालतो. जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, अहमदनगर आणि राहुरी येथे गुळाची मोठी बाजारपेठ आहे. श्रीरामपुर, संगमनेर, अहमदनगर व वांबोरी येथे तेलाच्या गिरण्या आहेत.

अहमदनगर, कर्जत, कोपरगाव, बाभळेश्वर आणि संगमनेर या ठिकाणी दूध शीतकरण केंद्रे आहेत. अहमदनगर येथे आयुर्वेदिक औषधी तयार करण्याचा कारखाना आहे. तसेच दुरदर्शन संच आणि मोपेड कारखाने आहे. कोपरगाव आणि कानेगाव येथे औषधाचे कारखाने आहे. कोपरगाव आणि कानेगाव येथे औषधाचे कारखाने आहेत. श्रीरामपुर येथे पंप आणि इंजिने बनवतात. श्रीरामपुर, हरेगाव आणि राहुरी येथे सुतगिरण्या आहे. संगमनेर, अहमदनगर, पाथर्डी आणि शेवगाव येथे जिनिंग व प्रेसिंगचा उद्योग आहे. अहमदनगर व सुपा येथे MIDC आहे.