पारनेर

तालुका पारनेर
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
मुख्यालय पारनेर
क्षेत्रफ़ळ १९३०.२८ कि.मी वर्ग.
लोकसंख्या २४६५३५ इ.स.२००१.
साक्षरता दर ६२.३१%
तहसीलदार शर्मिला भोसले.
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण
विधानसभा मतदारसंघ पारनेर
आमदार विजयराव औटी.
पर्जन्यमान ६९५ मि.मी.

             टाकळी ढोकेश्वर हे तेथील पौराणिक शिव मंदिरासाठीही खुप प्रसिध्द आहे. हे कोरीवकाम केलेले शिवमंदिर खुप मोठे असून ढोकी गावी कालू नदी जवळ आहे. हे शिवमंदिर पांडवानी त्यांच्या वनवास काळात एका रात्रीतून बांधले होते अशी अख्याईका सांगितली जाते. जेष्ठ समाज सेवक अण्णा ह्जारे यांच्या नेतृत्वाखाली गावात जो अमुलाग्र बदल झाला त्यामुळे राळेगण सिध्दी हे आदर्श गाव  म्हणून भारतभर प्रसिध्द आहे. १९७५ सालापासून गावाने जलसिंचन, सौरऊर्जा प्रकल्प, वृक्षारोपन, बायोगॅस प्रकल्प, पवनचक्की प्रकल्प इ. उपक्रम राबवले आहे. गावातील रस्त्यावरील सर्व बल्ब सौरऊर्जीने चालवले जातात. तालुक्यातील सुपा हे गाव तेथील पवनचक्की प्रकल्पासाठी प्रसिध्द आहे. हा ५० ते ६० पवनचक्क्याचा प्रकल्प गावाजवळील सर्व डोंगरवर पसरलेला आहे त्यामुळे हे पारनेर मधील उर्जा केंद्र बनले आहे. गावात MIDC सुध्दा आहे त्यामुळे गाव जिल्हातील अग्रणी गावात मोजले जाते. तालुक्यातील निघोज हे गाव कुकडी नदीतील रांजणखळगी आणि मलाबाई देवीच्या मंदिरासाठी जगभर प्रसिध्द आहे. लोणी माळवा हे गावातील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळी गावाभोवती बांधलेल्या उंच तटबंदी साठी प्रसिध्द आहे. निघोजजवळ पुष्पावती नदी आहे. विठ्ठलवाडी गावातील प्रसिध्द विठ्ठल रुक्मिणी मंदिर तेथे झालेल्या विठ्ठल जन्माच्या अख्याईकेमुळे खुप प्रसिध्द आहे. चहुबांजुनी डोंगरंने वेढलेल्या लोणीमाळा या गावातील रोकडेश्वर मंदिर, र्कजुले हरेश्वर गावातील हरेश्वर मंदिर आणि माळढोक धरण, पिपंळगाव रोहता गावातील श्री क्षेत्र कोठरण खंडोबा, दरोडी गावातील खंडोबा मंदिर, आणि चरंगेश्वर मंदिर, बाभुळवाडी गावातील शिवमंदिर तसेच रानघे गावातील अंबिका मंदिर प्रसिध्द आहेत. पारनेर शहरतील नागेश्वरचे मंदिरही खुप प्रसिध्द आहे.


पारनेर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पर्णवाद तत्त्वज्ञानाचे प्रणेते पारनेरकर महाराज यांचे येथे वास्तव्य होते. पारनेर येथून ३ कि.मी. अंतरावर डोंगरच्या कुशीत श्री सिध्देश्वर मंदिर आहे. तेथून थोड्याच अंतरावर पाराशर ऋषींची समाधी आहे. खिंडीतलास्वयंभू गणेश ही येथे प्रसिध्द आहे. पारनेर तालुका प्रतिकाशी म्हणून ही ओळखले जाते. पारनेर ही सेनापती बापटांची जन्मभुमी आहे. पारनेर मधील देवी भोयरे येथे तालुका सहकारी साखर कारखाना आहे. महाराष्ट्रतील बरेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक  पारनेर तालुकयातील आहेत.  पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावातून राष्ट्रीय राजमार्ग [NH २२२] मुंबई-विशाखापट्टणम तसेच पुणे-नाशिक हे महत्त्वाचे मार्ग गेले आहेत.

पारनेर तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अक्कलवाडी । अळ्कुटी । अपाधुप । अस्तागाव । बाभुळवाडे । बाबुर्डी । भाळवणी । भांडगाव । भॊंदरे । भोयरे गांर्गडा । चिंचोली । चोंभट । दैठण गुंजाळ । दरोडी । देसावडे । देवीभोयरे । ढवळ्पुरी । ढोकी । धोत्रे । बुद्रुक । दिकसाल । गांजी भोयरे । गारगुंडी । गारखिंडी । गतेवाडी । घाणेगाव । गोरेगाव । गुणावरे । हंगा । हतावळखिंड । हिवरे कोरडा । जाधववाडी । जामगाव । जतेगाव । जावळा । कडुस । काकणे वाडी । कळस । कळकुप । कान्हुर पठार । करंदी । कारेगाव । कर्जुले हर्या। कासार । काताळवेढा । खडकवाडी । किन्ही । कोहकडी । कुरुंद । लोणी हवेली । लोणी मावळा । म्ह्सकेवाडी । मालकूप । मांडवे खु.। मावळेवाडी । म्हसने । मुंगशी । नंदुर पठार । नारायण गव्हाण । निघोज । पाबळ । पाडळी आळे । पाडळी दर्या । पाडळी कान्हुर । पाडळी रांजणगाव । पळशी । पालसपुर । पालवे बु. । पालवे खु. । पनोली । पारनेर । पाथरवाडी । पिंपळगाव रोथा । पिंपळ्गाव तुर्क । पिंपळ्नेर । पिंपरी गवळी । पिंपरी जलसेन । पिंपरी पठार । पोखरी । पुणवाडी । रैताळ । राळेगण सिध्दी । राळेगण थेरपाल । रंधे । रांजणगाव माशिद । रेणवाडी । रुई छ्त्तीशी । सांगवी सुर्या । सारोळा अदवाई । सावरगाव । शांजापुर । शेरीकासार । शिरापुर । सिध्देश्वरवाडी । सुपा । टाकळी ढोकळेश्वर । तिखोल । वेसदरे । विरोळी । वाडेगव्हाण । वडगाव आमली । वडगाव सावतल । वडगाव दर्या । वड्नेर बु. । वडनेर हवेली । वडुळे । वडझिरे । वाघुंदे बु. । वाघुंदे खु. । वाळवणी । वांकुटे । वासुंदे । यादववाडी

No comments:

Post a Comment