कर्जत

तालुका कर्जत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग कर्जत
मुख्यालय कर्जत
क्षेत्रफ़ळ १५०३ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २०५५८५ इ.स.२००१
साक्षरता दर ५९.९५%
तहसीलदार एस.व्ही.थोरात.
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर.
विधानसभा मतदारसंघ कर्जत-जामखेड.
आमदार प्रा.राम शिंदे.
पर्जन्यमान १०५८ मिमी.
कार्यालयीन संकेतस्थळ 

कर्जत
कर्जत तालुक्याचे मुख्य ठिकाण असून अहमदनगर पासून ७५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. रेहकुरी हे काळविट आणि इतर पशुपक्ष्यांसाठीचे जगप्रसिध्द अभयारण्य येथे आहे. राशीन येथे श्री रेणुका देवीचे प्रसिध्द मंदिर असून मंदिरात रेणुका देवीचे असलेली यमाई देवी आणि तुकाई देवी यांच्या तांदळ्याच्या स्वरुपात स्वयंभू मूर्ती आहेत. येथे सालाबादप्रमाणे मोठी यात्रा भरते यात्रेसाठी देशभरातील भक्तगण येथे जमतात. महाराष्ट्रात असलेले एकमेव दुर्योधनाचे मंदिर दुरगाव येथे आहे.
सिध्दटेक या गावी भीमानदीच्या तिरावर अष्टविनायक हा तिसरा गणपती असून हे सिध्दिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. मंदिराचा गाभा प्रशस्त असून मंडपही मोठा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्नोध्दार करुन मंदिर बांधले.
कर्जतला उजनी धरण तसेच कुकडी आणि घोड नदीतून मिळणारया पाण्यावर येथे ऊस, द्राक्षे, अंजीर, दाळिंब, सुर्यमुखी आणि गहू ही नगदी पीके ही घेतली जातात. 
तालुक्यातील अंबिकानगर येथे श्री जगदंबा सह्कारी साखर कारखाना आहे. तालुक्यात देऊळवाडी तसेच दुर्गाव हे प्रेक्षणीय हे प्रेक्षणीय स्थळे आहेत.
कर्जत तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अखोणी । आळसुंडे । आंबिजळगाव । औटेवाडी । बाभुळगाव खालसा । बहिरबावडी । बराडगाव दगडी । बराडगाव सुद्रीक । बेळगाव । बेनवाडी । भांबुरे । चांदे बु. । चांदे खु. । चापडगाव । चिलवाडी । चिंचोळी खाळदट । चिंचोळी रामजन । देशमुखवाडी । धळवाडी । दिघी । दिक्सल । दुधोडी । दुरगाव । गणेशवाडी । घुमारी । गुरव पिंपरी । जलालपुर । जळगाव । जळकेवाडी । कल्याची वाडी । कांगुडवाडी । कोम्हली । कापरेवाडी । कारभनवाडी । कर्जत । कर्पडी । कौदाने । खंडाळा । खांदवी । खातगाव । खेड । कोकणगाव । कोपर्डी । कोरेगाव । कुलधरण । कुंभेफ़ळ । लोणी मसादेपुर । महाळुंगी । माही । मालठण । मांडळी । मिरजगाव । मुळेवाडी । नागलवाडी । नागमठ्ण। नागापुर । नांदगाव । नवसरवाडी । निंभे । निंभोडी । निमगाव डाकु । निमगाव गांगर्डा । परितवाडी । पतेगाव । पतेवाडी । पिंपळवाडी । पतेगाव ।  राक्षसवाडी बुम । राक्षसवाडी खु. । राशीन । रतनजन । रावळगाव । रेह्कुरी । रुईगव्हाण । शिंदे । टाकली खांडेश्वर । तलवाडी । तरडगाव । थेरगाव । थेरवाडी । थिखी । तोरकडवाडी । वडगाव तनपुरा । वाळवड । वयसेवाडी ।

No comments:

Post a Comment