श्रीगोंदा

तालुका श्रीगोंदा
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग कर्जत
मुख्यालय श्रीगोंदा
क्षेत्रफ़ळ १६०५.६१ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २७७३१९ इ.स.२००१.
साक्षरता दर ६३.७६ %
तहसीलदार राजेंद्र वाघ.
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण.
विधानसभा मतदारसंघ श्रीगोंदा.
आमदार बबनराव पाचपुते.
पर्जन्यमान ४४८ मि.मी.

श्रीगोंदा
श्रीगोंदा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून याचे पूर्वी नाव चंबरगोंदे होते. तालुक्यात पेडगाव येथे ऎतिहासीक धर्मवीरगड हा किल्ला असून तेथे पुरातन पाच मंदिरे आहे. त्यातील लक्ष्मीनारायण मंदिर आणि बेलेश्वर हे महदेव मंदिरातील खांबावर नक्षीदार कोरीवकाम केलेले आहे तसेच भिंतीवर प्राण्यांची चित्रे काढलेली आहे.
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी येथील धर्मवीरगडावर बहादूर खान गडाचा किल्लेदार असताना छापाटकून २०० अरब घोडे आणि धन जप्त केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावावरुन किल्याचे नाव बहादूरगड बदलून धर्मवीरगड केले आहे.
१९ व्या शतकात येथे ग्वाल्हेरचे राजे शिंदे घराण्यांचे शासन होते. येथे शिंदे घरण्यांचे चार मोठे राजवाडे आहेत. येथील हिंदू मुस्लिम ऎक्याचे प्रतिक म्हणजे ३०० वर्षापूर्वी होऊन गेलेले श्री शेख महंमद होय. हे मुसलमान असले तरी त्यांनी हिंदू धर्माचा भक्तिमार्ग स्विकारला. त्यांचे अनेक मराठी ग्रंथ व काव्यसंग्रह प्रसिध्द आहेत. ते मराठीतून ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत.
संत रोहिदास महाराज, सदगुरु प्रल्हाद महाराज, संत गॊधडे बुवा महाराज, संत कृष्णानंद महाराज, संत नारायण महाराज, संत तात्या महाराज, संत गोविंद बाबा महाराज आणि संत शेख महंमद महाराज या आठ संतामुळे हे गाव संताची पुण्यभुमी म्हणून ओळखली जाते. सरस्वती नदीच्या किनारयावर बालखंडेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. १६ व्या शतकातील सूर्यमंदिर तसेच श्रीराम मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, गणेश मंदिर, विष्णू मंदिर, शिव मंदिर, कालिका मंदिर, अंबिकामाता मंदिर, प्रसिध्द शनिमंदिर, मारूती मंदिर, भैरोबा  मंदिर, खंडोबा मंदिर तसेच नारायण आश्रम आहे. तालुक्यात श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना ही आहे.

 
श्रीगोंदा तालुक्यात एकुण ११५ गावे आहेत. ते खालीलप्रमाणे
आढळगाव । आधोरीवाडी । अझुंज । आनंदवाडी । अरणगाव डुमाळ । आर्वी । बाभुर्डी । बाणपिंपरी । बांगर्दा । बेलवंडी बु. । बेलवंडी कोठार । भानगाव । बोरी । चिंबोर्डी । चांदगाव । छावरसांगवी । चिखलठणवाडी । चिखली । चिंभाला । चोरीचिचवाडी । देवदैठण । देऊळगाव । धवळगाव । ढोराजा । एरंड्ली । गर । गव्हाणवाडी । घरगाव । घोडेगाव रविंद्र विश्वनाथ मचे । घोगरगाव । घोटवी । घुगळवडगाव । घुतेवाडी । हांगेवाडी । हिंगणीडुमाळा । हिरडगाव । कामठी । काष्टी । कैठा । खांडगाव । कोकणगाव । कोळ्गाव । कोंडेगव्हाण । कोरेगाव । कोरेगव्हाण । कोसेगव्हाण । कोतुळ । लिंपनगाव । लोणी व्यंकनाथ । मढेवडगाव । मांड्वगाव । मठ । म्हसे । म्ह्तार पिंपरी । मुंगसगाव । निंभवी । निमगाव खालु । पारगाव सद । पेडगाव । पिंपळगाव पिसे । पिंपरी कोळंदर । पिसोरी खांड । राईगव्हाण । राजापुर । रुईखेळ । सांगवी डुमाळा । सारोळा सोमनवंशी । शेडगाव । शिरसगाव बोडखा । सुरगाव । सुरोडी । टाकळी कडेवाळीत । टाकळी लोणार । तांद्ळी डुमाळा । तरडग्व्हाण । थेटेसांगवी । उकडगाव । उखळगाव । वड्ळी । वंगादरी । वेळु । विसापुर । येळपने । यौती 

No comments:

Post a Comment