संगमनेर

तालुका संगमनेर
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग संगमनेर
मुख्यालय संगमनेर
क्षेत्रफ़ळ १७०५ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या ४३९८०६ इ.स.२००१.
साक्षरता दर ६५.२१%
तहसीलदार संदीप आहेर
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ श्रीरामपुर
आमदार श्री.बाळासाहेब/विजय भाऊसाहेब थोरात.
पर्जन्यमान ४१६.६ मि.मी.

संगमनेर
संगमनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील एक शहर आहे. ते प्रवरा व म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. इतिहास १७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते. यादव राजांनी इ.स. २०० मध्ये बांधलेला पेमगिरीचा किल्ला येथे आहे. या किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याचे टाके आहे. शहाजहान व आदिलशाह यांनी निजामशाही संपवली त्यावेळी शहाजीराजे भोसले यांनी निजामशहाच अल्पवयीन वारसदार मूर्तझाला गादीवर बसवून पेमगिरीच्या भीमगडावरुन ३ वर्षे कारभार पाहिला.

तालुक्यातील पेमगिरी या गावी जुन्याकाळी चुन्याच्या खाणी तसेच येथील येळुशीच्या दर्यातील पेमगिरी कंद चुना प्रसिध्द होता. ह्याच गावी एक जुनी पायरयांची विहिर असून त्यात एक शिलालेखही आहे. गावाच्या शेजारी १.५२ हेक्टर आकारचे एक प्राचीन प्रसिध्द वडाचे झाड आहे. तालुक्यात अकलपुर येथे टेकडीवरील खोद्कामात सापडलेल्या पुरातन एकमुखी द्त्त मुर्तीचे मंदिर आहे. पळशी हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहसिक परंपरा असलेले गाव आहे. येथे हेमाडपंती अनेक आहे.

ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता. संगमनेर नगरपालिका द्वारतत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अॅकक्ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर इ. इ. फ्रादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून मामलेदार संगमनेर, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे. संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर सह्यादीच्या डोंगररांगाचा उतार संपतो, तिथं चंदनापुरी आणि कऱ्हे घाटात असलेलं संगमनेर भंडारदरा, नाशिक आणि शिर्डी यांपासून सारख्याच अंतरावर आहे.

' अमृतवाहिनी ' प्रवरा आणि म्हाळुंगी या नद्यांच्या संगमावर वसलेलं म्हणून गावाचं नाव ' संगमनगर ' पडलं असावं आणि त्याचंच पुढे ' संगमनेर ' झालं. संगमनेरचं नाव एक चळवळं शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याचं उदाहरण हनुमान जयंती रथोत्सवाचं सांगता येईल. संगमनेरला हनुमान जयंतीच्या दिवशी ' हनुमान-विजय ' रथाची मिरवणूक काढण्याची प्राचीन परंपरा आहे; पण १९२९ च्या हनुमान जयंतीच्या दिवशी ही मिरवणूक निघू नये , उत्सव होऊ नये म्हणून पाचशे सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले. अशा वेळी झुंबरबाई अवसक या शिंपी समाजातील धाडसी महिलेने पोलिसांना न घाबरता हनुमानमुर्ती रथात ठेवली आणि जमलेल्या पाचशे महिलांनी रथ ओढायला सुरुवात केली. महिलांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीला झुगारले आणि इतिहास घडवला. आजही हनुमान जयंतीला रथ ओढायचा पहिला मान स्त्रियांना दिला जातो.

संगमनेरला १८३२-३३ मध्येच नव्या पद्धतीचे शिक्षण देणारी सरकारी प्राथमिक शाळा सुरू झाली होती. त्यानंतर गोखले एज्युकेशन संस्थेने सर डी. एम. पेटीट विद्यालय सुरू केले; पण ग्रामीण मुला-मुलींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी संस्था सुविधा इथे नव्हती. शंकरराव जोशी नावाच्या एका सामान्य माणसाने तो ध्यास घेतला आणि शिक्षणप्रसारक संस्थेचं संगमनेर महाविद्यालय सुरू झालं. व्यापाराबरोबरच समाजकारण करणाऱ्या कार्यर्कत्यांनी याच दरम्यान संगमनेर मर्चंटस् को-ऑप. बँक स्थापन केली.

पाऊस नियमित नसल्याने, ब्रिटिश काळात अस्तित्वात आलेले प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण संगमनेरसाठी जीवनदायी आहे. ४० वर्षे म्हाळादेवी-निळवंडे वादात अडकलेला आणि नंतर निळवंड्याला प्रत्यक्ष काम सुरू झालेला ' ऊर्ध्व-प्रवरा प्रकल्प ' अद्याप रखडलेलाच आहे. उपसा जलसिंचन योजना, जलसंधारण योजना, बंधारे यांच्या योजना झाल्या. बागायत वाढली. शेतकऱ्यांच्या दुधासारख्या जोडधंद्याला सहकारातून चालना मिळाली. दूध, भाजीपाला यांच्या मुबलक उत्पादनांमुळे बाजारपेठ भरभराट पावली. स्वातंत्र्यापूवीर्पासून विडी कामगार हा राजकीयदृष्ट्या जागरूक असलेला संघटितवर्ग होता. १९६१ साली कामगारांनी संगमनेर कॉलेजच्या स्थापनेसाठी दोन दिवसांची मजुरी देऊन सामाजिक भानही प्रगट केले होते. हातमाग साडीसाठी गाव प्रसिद्ध होते. साळी, पद्मसाळी, निऱ्हाळी, कोष्टी, मोमीन व क्षत्रिय समाजातील लोक या व्यवसायात आघाडीवर होते.

महाराष्ट्रातील सर्वात जुन्या पाच नगरपालिकांपैकी इथली पालिका. विविध प्रकल्पांची प्रयोगशाळा असलेल्या संगमनेर महाविद्यालयाचे नेतृत्व करणारे प्राचार्य म. वि. कौंडिण्य महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रात आदरस्थानी आहेत. साखर कारखाना, मालपाणींचा तंबाखू जर्दा उद्योग आणि मोडकळीस आलेले विडी कारखाने, औद्योगिक वसाहत असली. विडी कारखान्यांची रोजगार पुरविण्याची पूवीर्ची क्षमता शिल्लक नाही. भक्तगण स्वामी समर्थ केन्द, गगनगिरी महाराज, अनिरुद्धबापू, नरेन्द महाराज, कलावतीदेवी अशा अनेकांभोवती गर्दी करतो आहे व यात तरुणांचा भरणाही लक्षणीय आहे.

 
संगमनेर तालुक्यात एकुण १७१ गावे आहेत. ते खालीलप्रमाणे :
अकलपुर । अंभोर । अंबीडुमाळा । अंबीखलसा । आश्वी बु. । आश्वी खु. । औरंगपुर  । भोजदरी । बिरेवाडी । बोरबनवाडी । बोटा । चंदनपुरी । चनेगाव । चिकनी । चिखली । चिंचोळी गुरव । चिंचपुर खु. । चिंचपुर बु. । छोरकैठे । दरेवाडी । देवगाव । धड खु. । धांदरफ़ळ खु. । धांदरफ़ळ बु. । दिग्रास । डोळसणे । घरगाव । घुलेवाडी  । गुंजाळवाडी । हंगेवाडी । हिवरगाव पठार । हिवरगाव पावसा । जाखोरी । जांभुळ्वाडी । जांबट बु. । जावळीबाळेश्वर । जावळी कड्लग । जोरवे । कांजापुर । कंकापुर । कानोळी । कर्जुलेपठार । कारुळे । कासारधुमाळ । कासारे । खळी । खंबे । खंडरमलवाडी । खांडगाव । खर्डी । खरे । खरशिंडॆ । कोकणगाव । कोल्हेवाडी । कोलवडॆ । कोंची मांची । कैठे बु. । कैठे मलकापुर । कुराण । कुरकुंडी । कारुळे । महालवाडी । मालाड्द । मालेगाव हवेली । मालेगाव पठार  । माळुंजे । मांड्वे बु. । मांगलापुर । मनोली । मेंढवन । म्ह्सवंडी । मिरपुर । मिर्झापुर । नंदुरी धुमाळा । नांदुरखांडरमल । निळवंडे । निमज । निंबळे । निमगाव बु. । निमगाव खु. । निमगाव टेंभी । निमगाव जळी । निमोन । नंज धुमाळ । ओझर बु. । ओझर खु. । पाळसखेडे । पानोडी । पारेगाव बु. । पारेगाव खु. । पेमगरी । पिंपळगाव माथा । पिंपळगाव डेफ़ा । पिंपळगाव कोंजिरा । पिंपर्णी । पिंपळे । पिंपरीलौकी आझमपुर । पोखरी बाळेश्वर । पोखरी हवेली । प्रतापपुर । रहीमपुर । राजपुर । रणखंबवाडी । रयते । रय़तेवाडी । साद्तपुर । साकुर । सामनापुर । संगमनेर खु. । सांगवी । सारोळा पठार । सावरचोळ । सावरगाव घुले । सावरगाव ताल । सायखिंडी । शेडगाव । शिभलापुर । शिंदोडी । शिरापुर । शिरसगाव धुपे । सोनेवाडी । सोनोशी । सुखेवाडी । तळेगाव । तिसगाव । उंबरी बालापुर । घोलहाले । वडगाव लांडगा । वडगावपान । वडझरी बु. । वडझरी खु. । वाघापुर । वानकुटे । वारुडी पठार । वारवंडी । झरेकाठी । झोळ 

No comments:

Post a Comment