पाथर्डी

तालुका पाथर्डी
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
मुख्यालय पाथर्डी
क्षेत्रफ़ळ १२१४.१ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २१४८२९ इ.स.२००१.
साक्षरता दर ६०.०९ %
तहसीलदार व्ही.एम.खरमाळे.
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर
विधानसभा मतदारसंघ शेवगाव-पाथर्डी
आमदार चंद्रशेखर घुले.
पर्जन्यमान ५८० मिमी.

पाथर्डी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. पांडवांच्या वनवास काळात पार्थ म्हणजे अर्जुन याला स्वर्गातील अप्सरे कडून काही काळासाठी नपुसंकतेचा शाप मिळाला त्यावेळी पार्थ येथे रडला होता त्यावेळेपासून गाव पाथर्डी या नावाने ओळखले जाते असा नावाबद्दलचा पैराणिक दाखला स्थानीक रहिवाशांनकडून मिळतो. तालुक्यात वृध्देश्वर येथे वृध्देश्वर सहकरी साखर कारखाना आहे. वृध्देश्वर हे तालुक्यातील नाथ संप्रदायाचे आद्दपीठ असून नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. वृध्देश्वर येथे शंकराचे जागृत देवस्थान आहे. तसेच तालुक्यात श्री क्षेत्र मढी, श्री क्षेत्र मोहटा देवी, श्री क्षेत्र हनुमानटाकळी, श्री क्षेत्र दैत्यनांदुर , श्री क्षेत्र माणिकदौंडी, श्री क्षेत्र खरवंडी (भगवान गड) हे महत्तवाचे धार्मिकस्थळे आहेत.

पाथर्डी तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अडगाव । अगसखांड । अकोला । अल्हानवाडी । अंबिकानगर । औरंगपुर । भालगाव । भारजवाडी । भिलवडे । भोसे । भुतेटाकळी । बोरसेवाडी । चिचोंडी । चिंचपुर इजडे । चिंचपुर पांगुल । चितळी । दगडवाडी । धमालवाडी । डांगेवाडी । देवराई । ढाकणवाडी । धामणगाव । धनगरवाडी । धारवाडी । धावळेवाडी । धुळेचांदगाव । एकनाथवाडी । घाटशिरस । घुमटवाडी । गितेवाडी । हनुमान टाकळी । जांभळी । जतदेवले । जवखेडे खालसा । जवखेडे धुमाळा । जावळवाडी । जिरेवाडी । जोगेवाडी । जोहरवाडी । खांडगाव । कलासपिंपरी । कामतशिंगवे । करंजी । कारेगाव । खर्डी । कासार पिंपळगाव । कवडगाव । केळवंडी । केशवशिंगवे । खांडगाव। खरवंडी कासार । खेरडे । कोल्हार । कोलसणगाव । कोपरगाव । कोरडगाव । लांडकवाडी । लोसार । मढी । मालेवाडी । माळी बाभुळगाव । मांडवे । माणिकदौंडी । मिडसांगवी । मिरी । मोहरी । मोहटा । मोहोज बु. । मोहोज खु. । मोहोज देवडे । मुंगुसवाडी । नंदुर निंबदैत्य । निपाणी जळगाव । निवडुंगे । पाडळी । पागोरी पिंपळगाव । पारेवाडी । पाथहाचा तांडा । पिंपळगव्हाण । पिंपळगाव टापा । पिरेवाडी । राघुहिवरे । रांजणी । रेणुकाईवाडी । साईदासपुर । साकेगाव । सांगवी बु. । सातवड । शंकरवाडी । शेकटे । शिरळ । शिरापुर । शिरसाठवाडी । सोमढाणे खु. । सोमढाणे । सोनोशी । सुसरे । टाकळी माणुर । टिंखडी । तीसगाव । तोंडळी । वडगाव । वैजुबाभुळगाव । वाळुंज । येळी

No comments:

Post a Comment